रत्नागिरी : मच्छीमांराना डिझेल परताव्याचे 15 कोटी 88 लाख प्राप्त | पुढारी

रत्नागिरी : मच्छीमांराना डिझेल परताव्याचे 15 कोटी 88 लाख प्राप्त

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार नौकांच्या डिझेल परताव्याची थकीत रक्कम 42 कोटी रुपये इतकी आहे. यापैकी 15 कोटी 88 लाख रुपये परताव्याचे अनुदान सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाले असल्याचे प्रभारी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील 27 मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये 1 हजार 406 मच्छीमार नौका डिझेल कोट्यातील आहेत. या नौकांचा 42 कोटी रुपयांचा परतावा शासनाकडून प्राप्त व्हावा, यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी 15 कोटी 88 लाख रुपयांचे परताव्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. मच्छीमार नौकांचा डिझेल परतावा मिळण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांकडून सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे नौकांची यादी येते. प्राधान्य क्रमानुसार प्राप्त परतावा संबंधित मच्छीमार नौका मालकांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो.

Back to top button