सिंधुदुर्ग : कुडाळात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला मोठी गर्दी; मुख्यमंत्र्यांचे मोबाईल टॉर्च ऑन करत स्वागत | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला मोठी गर्दी; मुख्यमंत्र्यांचे मोबाईल टॉर्च ऑन करत स्वागत

कुडाळ : पुढारी वुत्तसेवा : कुडाळ येथे ‘शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन होताच ढोल, ताशांच्या गजरात तसेच मोबाईल टॉर्च ऑन करुन उपस्थितांनी जल्लोषी स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हात उंचावत मोबाईल टॉर्च ऑन करुन उपस्थितांना अभिवादन केले.नियोजित वेळेपेक्षा दिड तास उशिरा ना.शिंदे कार्यक्रम स्थळी हजर झाल्याने नागरीक काहीसे अपसेट झाले.

कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर “शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी” कार्यक्रम सुरू झाला. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, आमदार तथा रत्नागिरी -सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, माजी खासदार कर्नल सुधीर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, जिल्हा निवासी अधिकारी मच्छिद्र सुकटे आदी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी” हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. या कार्यक्रमादरम्यान चित्रफीतीद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दाखविण्यात आली. तसेच “योजना दुत” अॅप्लिकेशन बाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे डॉ. अमोल शिंदे यांनी माहिती दिली.

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या टप्यात कार्यक्रमस्थळी स्नेहा आजगावकर, सागर कुडाळकर व प्रफुल्ल वालावलकर यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी महाराष्ट्र गीते सादर केली. या कार्यक्रमाला लाभार्थी व नागरीकांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती.

Back to top button