चिपळूण. पुढारी वृत्तसेवा : माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. मी बरबाद झालो आहे. माझे नुकसान होत असून मी आयुष्यातून उठलो आहे. असे सांगत एकाने मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटातील रस्त्यावर चक्क लोळण घेतली.
आपली मागणी कोण ऐकत नाही. कोणीही दखल घेत नाही. यासाठी आपण हे आंदोलन करीत आहोत, असे सांगत थेट चौपदरी रस्त्यावर त्याने लोळण घेऊन महामार्ग 25 मिनिटे अडविला. भर उन्हात आज सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दुथर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला. या प्रकरणी त्याच्यावर पोलीसांनी महामार्ग रोखला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
-हेही वाचा