रत्नागिरी जिल्ह्यात होणार तीन नवीन धान्य गोडावून | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात होणार तीन नवीन धान्य गोडावून

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जिल्हा पुरवठा विभागाची सध्या 13 गोदामे आहेत. या 13 गोडावूनची 10 हजार 660 मेट्रिक टन इतकी क्षमता आहे. या गोडावूनपेक्षा तिप्पट क्षमता असलेली 3 नवीन धान्य गोडावून खेड, गुहागर आणि लांजा येथे होणार असून, यासाठी प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

खेड येथील नवीन गोडवूनसाठी 1 कोटी 5 लक्ष 87 हजार 845 , गुहागर मुंडर 2 कोटी 27 लाख 30 हजार 561, लांजा गोडावून 1 कोटी 86 लाख 12 हजार 78 हे 3 नवीन गोडावूनचे प्रस्ताव असून तर राजापूर 92 लाख 26 हजार, संगमेश्वर 55 लाख 62 हजार गोडावून दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील नवीन गोडावूनची क्षमता ही तिप्पट असणार आहे. शासन निर्देशानुसारच नवीन होणारे धान्य गोडावून ही तिप्पट क्षमतेची असणार आहेत.

कडवईतील ‘तो’ तांदूळ तपासणीसाठी लॅबला

संगमेश्वर तालुक्यातील कडवई रास्त धान्य दुकानात प्लास्टिक तांदूळ असल्याचा स्थानिकांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे या ठिकाणी जाऊन 6 पाकिटे तांदूळ तपासणीसाठी घेण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून 45 तांदूळ मिश्रित करून दिलेला असतो. हा तांदूळ लगेच पाण्यात विरघळत नाही. वजनानेही हलके असतात. काही टक्केवारीत हे नियमितपणे तांदळामध्ये मिसळले जाते. कारण हे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, या बाबत उलट-सुलट चर्चा तेथील स्थानिक नागरिक करत होते. त्यामुळे नमुन्यासाठी घेतलेली 6 पाकिटे तांदूळ पुणे येथे केवळ नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी लॅबला तपासणीसाठी पाठवल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

Back to top button