रानमेव्यात कोकणचे अर्थकारण बदलण्याची ताकद | पुढारी

रानमेव्यात कोकणचे अर्थकारण बदलण्याची ताकद

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : आंबा, काजू आणि निसर्गाचे सौंदर्य म्हटले की, कोकण आठवते, पण त्यापलीकडे जाऊनही कोकणात जांभूळ, फणस, करवंद, अळू हा कोकणी मेवा उपलब्ध होत असतो. मागील काही वर्षांत करवंद, फणस, जांभूळ यावर प्रक्रिया करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत. जांभूळ, करवंद यांची सरबते, जाम, वड्या तर फणसावर तळलेले गरे, भाजी यासाठीही प्रक्रिया केली जात आहेत. या कोकणी मेव्याला मागणी असली तरी मोठ्या शहरांमध्ये ठराविक प्रक्रिया केलेले पदार्थच मिळत असल्याने, यासाठी मार्केटिंगच्या द़ृष्टीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात आंबा, काजू प्रमाणेच फणसासाठीही योग्य वातावरण आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात फणसाची शेती केली जाते. परंतु कोकणात फणसाकडे शेतीच्या द़ृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे शेतात, बागेत, घराजवळ असणार्‍या फणसाच्या झाडापासून मिळणारे उत्पन्नच घेतले जाते. मागील तीन-चार वर्षांत फणसाच्या कच्च्या गर्‍यांवर प्रक्रिया करून तळलेले गरे, फणसवडी, फणसपोळी, सरबत बनवली जात आहेत. त्यातही तळलेले गरे करण्याचे व्यवसाय बचत गटांच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. काही ठिकाणी फणसाच्या कुयर्‍याची भाजी बनवण्यासाठी किंवा कच्चे गरे पॅकबंद करून भाजीसाठी विकले जात आहेत. बचत गट किंवा जिल्ह्यातील काही प्रक्रिया उद्योजकांनी इन्संट भाजीसाठी फणसाचे गरे पॅकबंद करून विकण्यास सुरुवात केली आहे. त्याला ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.
फणसाप्रमाणेच आणखी एक फळ म्हणजे रातांबा म्हणजेच कोकम. कोकमलाही मागणी वाढत आहे. कोकम सरबत, कोकम आगळ, आमसुलं अशा पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. कोकमच्या बियांपासून तेलही काढले जात असून, त्याला औषधोपयोगामुळे मागणीही आहे. बचत गटांच्या माध्यमातून किंवा छोट्याछोट्या उद्योगांनी यात बस्तान बसवले आहे. मुंबई, पुणे, दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी कोकम सरबत, आगल यांना मागणी आहे.

जिल्ह्यात जांभळावर प्रक्रिया केली जात असली तरी शेती म्हणून जांभळाच्या झाडांची लागवड होताना दिसत नाही. शेताच्या बांधावर, जंगलात, रस्त्यांच्या बाजूने जांभाळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जांभुळ हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करीत असल्याने, जांभळाच्या रसाला, जांभूळवडी याला मोठी मागणी आहे. जिल्ह्यात यावर प्रक्रिया उद्योगमात्र कमी आहेत. जिल्ह्यातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात सापडणारे आणखी एक फळ म्हणजे करवंद, आंबट-गोडपणा असणारे हे फळ मोठ्याप्रमाणात मिळत असले तरी त्यावर प्रक्रिया करणार्या बचत गट किंवा उद्योगांची संख्या अल्प आहे. यापासून करवंद सरबत, करवंद वडी, लोणचे आदी प्रक्रिया करुन पदार्थ बनवले जात आहे. याला मागणीही असून, त्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. आंबा-काजू व्यतिरिक्तच्या कोकणी मेव्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्यास मदत होईल.

आंबा-काजूकडे अर्थाजनासाठी पाहिले जाते. परंतु कोकम, जांभुळ, फणस याच्या लागवडीबरोबरच प्रक्रिया उद्योगांनाही सरकारी पातळीवर चालना दिली गेली पाहिजे. कोकणच्या जंगल भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात करवंद उपलब्ध असते, त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास शेतकर्‍यांना आंबा-काजूप्रमाणेच उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत निर्माण होऊ शकतो. त्याच्या मार्केटींगसाठीही शासकीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

… तर प्रक्रिया क्षमता वाढू शकते

जिल्ह्यात जवळपास 15 हजारांहून अधिक महिला बचतगट आहेत. यातील 40 ते 45 टक्के बचत गट हे रान मेव्यावर प्रक्रिया करुन पदार्थ बनवत असतात. परंतु प्रक्रियाचे प्रमाणे अत्यल्प असते. या बचतगटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाल्यास, त्यांची प्रक्रिया करण्याची क्षमताही वाढू शकते व त्यातून त्यांना चांगल्याप्रकारे अर्थाजन होऊ शकते. सध्या बचत गटांमार्फत, आंबा पल्प, आंबा पोळी, आंबावडी, फणस पोळी, तळलेले गरे, कोकम सरबत, कोकम आगळ, कोकम, जांभुळ वडी, जांभुळ सरबत, करवंद पल्प आदी तयार केले जाते. मात्र हा हंगामी व्यवसाय बचत गट करीत

Back to top button