आगामी दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट | पुढारी

आगामी दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट

रत्नागिरी : कोकणात पुढील दोन दिवस कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

मुंबईसह रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात सातत्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्याची किरणे अधिक तापदायक ठरू शकतात.

Back to top button