रत्नागिरी : दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचे निलंबन | पुढारी

रत्नागिरी : दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचे निलंबन

दापोली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचे निलंबन केले आहे. देशपांडे सध्या रायगड़ (रोहा) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निलंबनाचे आदेश आजच काढण्यात आले असून दापोलीत उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना कामात केलेल्या अनियमितते बद्दल हा आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे.

याबाबतचा दावा भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट केली आहे. जयराम देशपांडे यांनी अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट व अन्य १७ प्रकरणांत खोट्या व बेकायदेशीर पद्धतीने विकास क्षेत्रात बांधकाम करण्याच्यी परवानगी दिल्या प्रकरणी हे निलंबन केल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button