भर समुद्रात नौका पेटली; एक खलाशी जखमी | पुढारी

भर समुद्रात नौका पेटली; एक खलाशी जखमी

देवगड : अचानक आग लागल्याने मच्छिमारी करण्यासाठी गेलेली नौका भर समुद्रात पेटली. सुदैवाने इतर नौका, स्थानिक मच्छिमार तसेच सागरी सुरक्षा विभागाच्या स्पीड बोटीने घटनास्थळी जावून नौकेवरील आठ खलाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच स्थानिक मच्छिमार व मच्छिमारी नौकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

या घटनेत नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर एक खलाशी भाजल्याने जखमी झाला. महेंद्र यशवंत कांबळे (वय ६०, रा. कोलते, लांजा, जि. रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना देवगड समुद्रात १० नॉटीकल मैलामध्ये रविवारी सकाळी ९.४५ वा.च्या सुमारास घडली. देवगड बंदरातील गणपत भिकाजी निकम यांची पुण्यश्री नौका मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. या नौकेवर आठ कर्मचारी होते. रविवारी सकाळी ९.४५ वा. च्या सुमारास नौकेला अचानक आग लागली. यात खलाशी महेंद्र यशवंत कांबळे हे भाजले गेले. नौकेला आग लागल्याचे समजताच बाजूला मच्छिमारी करणाऱ्या पेट घेतलेल्या नौकेचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

Back to top button