रत्नागिरी : माय-लेकीच्या लढतीत आईची बाजी | पुढारी

रत्नागिरी : माय-लेकीच्या लढतीत आईची बाजी

गुहागर शहर; पुढारी वृत्तसेवा :  सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आरे- वाकी- पिंपळवट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 1 मध्ये आई विरुद्ध मुलगी रिंगणात उतरली होती. यामुळे या माय-लेकींच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर मतमोजणीनंतर आईनेच या निवडणुकीत बाजी मारली आणि लेकीचा 50 मतांनी पराभव केला.

सुवर्णा भोसले यांच्याविरुद्ध त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर या ना. मा. प्र. स्त्री प्रवर्गातून निवडणूक लढवित होत्या. आई विरुद्ध मुलगी अशी लढत असल्याने सर्वांचे लक्ष लागून होते. मतमोजणीवेळी आई सुवर्णा भोसले यांना 282 तर मुलगी प्राजक्ता देवकर यांना 232 मते मिळाली.

Back to top button