रत्नागिरी : विदर्भ-कोकण रेल्वे गाडी 1 जानेवारीपर्यंत धावणार! | पुढारी

रत्नागिरी : विदर्भ-कोकण रेल्वे गाडी 1 जानेवारीपर्यंत धावणार!

रत्नागिरी;  पुढारी वृत्तसेवा :  नागपूर ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या द्विसाप्ताहिक रेल्वे गाडीच्या एका फेर्‍यांना 1 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विदर्भातून कोकणात थेट रेल्वेने येणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नागपूर ते मडगाव दरम्यान 011 39/01149 अशी आठवड्यातून दोन दिवस विशेष रेल्वे गाडी चालवली जाते. कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार या गाडीच्या फेर्‍यांना 2 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातून थेट कोकणात येणारी ही गाडी आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत 1 जानेवारी 2023 पर्यंत धावणार आहे.

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार 01139 / 01149 ही सुधारित वेळापत्रक तसेच थांब्यांसह धावणार आहे. यानुसार ही गाडीवरील कालावधीत नागपूर स्थानकावरून दर बुधवार तसेच शनिवारी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मडगावला ती सायंकाळी 5:45 मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. 3 नोव्हेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत मडगाव जंक्शन वरून दर गुरुवार तसेच रविवारी रात्री 8 वा. सुटून नागपूर लागली दुसर्‍या दिवशी रात्री 9.30 वाजता पोहोचेल.

ही गाडी आपल्या प्रवासात वर्धा, पुळगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी तसेच करमाळी स्थानकांवर थांबे घेणार आहे. एकूण 22 डब्यांची ही गाडी वातानुकूलित टू टायर, वातानुकूलित थ्री टायर, स्लीपर तसेच सेकंड सीटिंग अशा मिश्र आसन व्यवस्थेसह धावणार आहे.

Back to top button