रत्नागिरी : करोडोंच्या रकमेवर सायबर चोरांचा डल्ला | पुढारी

रत्नागिरी : करोडोंच्या रकमेवर सायबर चोरांचा डल्ला

लांजा; पुढारी वृत्तसेवा :  लांजा येथील यश कंस्ट्रक्शन फर्मच्या बँक ऑफ इंडिया लांजा शाखेतील खात्यातून तब्बल 92 लाख
50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांकडून बँकेची ‘स्टार टोकन’ ही आर्थिक व्यवहाराची सिस्टीम हॅक करून ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे पैसे परस्पर काढून फसवणूक केली असल्याने हा गुन्हा लांजा पोलिस
ठाण्यात दाखल झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक झाल्याने बँकेच्या ऑनलाईन प्रणालीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयाकृत बँकेत घडलेल्या या घटनेमुळे लांजा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

लांजा शहरातील प्रतिष्ठीत शासकीय ठेकेदार व यश कंस्ट्रक्शनचे मालक सुधीर भिंगार्डे यांनी या बाबत फिर्याद दाखल केली आहे. या नुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजात यश कन्स्ट ?क्शन ही शासकीय बांधकाम कामे करणारी मोठी फर्म आहे. लांजा शहरातील गणेश वसाहत परिसरात राधाई निवास या ठिकाणी या व्यवसायाचे ऑफिस आहे. या फर्मचे कंपनी अकाऊंट बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत आहे. या फर्मच्यावतीने या बँक खात्यावरून नेट बँकिंगद्वारे कार्यालयीन संगणकावरून व्यवहार केले जातात. या बँक खात्यातून 7 ऑक्टोबरला बँक खात्याला जोडलेल्या सुधीर भिंगार्डे यांच्या मोबाईल नंबरवर बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे मेसेज आले. कोणताही व्यवहार केलेला नसताना हे पैसे का कमी झाले म्हणून बँकेच्या स्टार टोकन सिस्टीमने तपासण्याचा प्रयत्न
करण्यात आला. नेट बँकिंग करिता असलेले बँकेचे स्टार अप टोकन ही बँकिंग सेवा त्या दिवशी चालू नव्हती. त्यामुळे फर्मचे व्यवस्थापक वसंत मसणे यांनी बँक ऑफ इंडियाच्या लांजा शाखेत जाऊन याची खातरजमा केली.

या फसवणुकीच्या घटनेतील घटनाक्रम सात दिवसांचा राहिला आहे. यामध्ये सुरुवातीला 28 सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहा बँकेच्या सीसी
खात्याला कनेक्ट असलेल्या जिओ मोबाईल नंबरला 149 चा रिचार्ज परस्पर आला. 29 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता बँकेला लिंक असलेल्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून कॉल आला. पलीकडून बोलणार्‍याने मी जिओ कंपनीतून बोलत असून तुमचा मोबाईल तुमच्या आधार कार्ड लिंक करा, आधार कार्ड लिंक केले नाही तर मोबाईल बंद पडेल, असे सांगितले. या वर सुधीर भिंगार्डे यांनी मी तुम्हाला काहीही माहिती देणार नाही, मी माझी ही प्रोसेस करून घेईन, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीचा पुन्हा कॉल आला नाही

बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांना धक्का

या घटनेची लांजा शहर परिसरात माहिती होताच एकच खळबळ उडाली आहे. राष्ट ?ीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडियामधील स्टार टोकन अ‍ॅप हे व्यवहार करण्यासाठी अतिशय सुरक्षित असे म्हणून वापरले जाते. परंतु, याच नेट बँकिंग सेवेतच ही फसवणूक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या बँक खात्याविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट ?ीयीकृत बँकेत जर का असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे पैशांची जबाबदारी कोण घेणार, असा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शहर व तालुक्यातील बँकेच्या खातेदारांना ध ?ा बसला असून बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Back to top button