सिंधुदु्र्ग : चालूवर्षी गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी पाऊस | पुढारी

सिंधुदु्र्ग : चालूवर्षी गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी पाऊस

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम 30 सप्टेंबर रोजी संपला. या वर्षी गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी 29 सप्टेंबरपयर्ंत सरासरी 3879 मिलीमीटर पाऊस झाला होता तर यावर्षी सरासरी 3112.1 एवढा मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा सरासरी 767 मि मी पाऊस कमी आहे. मागील 5 वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वात कमी पाऊस झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून 2022 ते सप्टेंबर 2022 या चार महिन्यांच्या कालावधीत देवगड तालुक्यात 2487.1 मिलिमीटर पाऊस, मालवण 2821.4 मिलिमीटर पाऊस, सावंतवाडी 3452.6 मिलिमीटर पाऊस, वेंगुर्ला 2895.1 मिलिमीटर पाऊस, कणकवली 3334.1 मिलिमीटर पाऊस, कुडाळ 3312.6 मिलिमीटर पाऊस, वैभववाडी 3705.1 मिलिमीटर पाऊस, दोडामार्ग तालुक्यात 3459.2 मिलिमीटर पाऊस मिळून एकूण 3112 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तर 2018 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 3111.37 मिलिमीटर पाऊस, 2019 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 4386 मिलिमीटर पाऊस, 2020 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 4596 मिलिमीटर पाऊस, तर 2021 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 3879 मिलिमीटर पाऊस झाला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2018 मध्ये जून 2018 ते सप्टेंबर 2018 या चार महिन्यांच्या कालावधीत 311.37 मिलिमीटर पाऊस झाला होता. यामध्ये जून महिन्या अखेर 1393.38 मिलिमीटर पाऊस, जुलै महिन्याअखेर 2401.45 मिलिमीटर पाऊस, ऑगस्ट महिन्याअखेर 2960.37 मिलिमीटर पाऊस, तर सप्टेंबर महिन्या अखेर 3111.37 मिलिमीटर पाऊस झाला होता. तसेच 2019 मध्ये जून 2019 ते सप्टेंबर 2019 या चार महिन्यांच्या कालावधीत 4386.155 मिलिमीटर पाऊस झाला होता. यामध्ये जून महिन्या अखेर 829.905 मिलिमीटर पाऊस, जुलै महिन्याअखेर 2229.7575 मिलिमीटर पाऊस, ऑगस्ट महिन्याअखेर 3456.0325 मिलिमीटर पाऊस, तर सप्टेंबर महिन्या अखेर 4386.155 मिलिमीटर पाऊस झाला होता. 2020 मध्ये जून 2020 ते सप्टेंबर 2020 या चार महिन्यांच्या कालावधीत 4596.569 मिलिमीटर पाऊस झाला होता. यामध्ये जून महिन्या अखेर 1149.625 मिलिमीटर पाऊस, जुलै महिन्याअखेर 2614.994 मिलिमीटर पाऊस, ऑगस्ट महिन्याअखेर 3857.19 मिलिमीटर पाऊस, तर सप्टेंबर महिन्या अखेर 4596.569 मिलिमीटर पाऊस झाला होता.

2021 मध्ये जून 2021 ते सप्टेंबर 2021 या चार महिन्यांच्या कालावधीत 3879.3575 मिलिमीटर पाऊस झाला होता. यामध्ये जून महिन्या अखेर 1097.31 मिलिमीटर पाऊस, जुलै महिन्याअखेर 2711.385 मिलिमीटर पाऊस, ऑगस्ट महिन्याअखेर 3185.3575 मिलिमीटर पाऊस, तर सप्टेंबर महिन्या अखेर 3879.3575 मिलिमीटर पाऊस झाला होता.

Back to top button