रत्नागिरी : कोकणकन्या एक्स्प्रेस 20 जानेवारीपासून सुपरफास्ट!

रत्नागिरी : कोकणकन्या एक्स्प्रेस 20 जानेवारीपासून सुपरफास्ट!
Published on
Updated on

रत्नागिरी; दीपक शिंगण : कोकण रेल्वेमार्गे रोज धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस दि. 20 जानेवारी 2023 सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या एकूण प्रवासात तब्बल दोन तास दहा मिनिटे बचत होणार आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या या महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेस आतापर्यंत 10112 व 10111 या क्रमांकासह धावत होती. आता ही गाडी डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर धावणार असून ती 20 जानेवारी 2023 पासून सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. या गाडीचा क्रमांकही बदलणार असून वेगवान होणार कोकणकन्या एक्स्प्रेस 20111/20112 या क्रमांकासह धावेल. ही गाडी आतापर्यंत मडगाव येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईतील सीएसएम टी स्थानकावर पोचत होती. नवीन वर्षात ही गाडी मडगाव येथून दोन तास दहा मिनिटे उशिराने सुटणार. दि. 20 जानेवारी 23पासून ही गाडी मडगाव येथून सायंकाळी 4.50 ऐवजी 7 वा. सुटणार आहे. असे असले तरी मुंबईत सीएसएमटी स्थानकावर ती आधीच्याच 5 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे. थोडक्यात कोकणकन्या एक्सप्रेस विजेवर धावणार असल्याने तिच्या एकूण प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत झाली आहे.

सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस दि. 20 जानेवारीपासून सावंतवाडीला रात्री 8 वाजून 36 मिनिटांनी, कुडाळला रात्री 8.58 यांनी कणकवलीला रात्री 9 वाजून 28 मिनिटांनी, राजापूरला 10.14 मिनिटांनी, रत्नागिरी स्थानकावर रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी, चिपळूणला मध्यरात्री नंतर एक वाजून 28 मिनिटांनी तर खेडला ती रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. मुंबई सीएसएमटीहून मडगावकडे येताना सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस 20111 आधीप्रमाणे रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणार असून पनवेलपर्यंत या डाऊन गाडीच्या वेळापत्रकात बदल होणार असला तरी गाडी स्पीडअप झाल्यामुळे खेड स्थानकावर ती आधीच्या पहाटे 3.20 ऐवजी तीन वाजून चार मिनिटांनी येईल. चिपळूणला कोकणकन्या एक्सप्रेस आधी 3:58 ला यायची. मात्र, जानेवारीत सुपरफास्ट झाल्यावर ती 3 वाजून 30 मिनिटांनी येईल. संगमेश्वरला डाऊन कोकणकन्या आधी पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी यायची आता ती चार वाजून दोन मिनिटांनी येईल. सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावर पूर्वीच्या पाच-पंचवीस ऐवजी 4 वाजून पंचवीस मिनिटांनी येईल. मुंबईवरून येताना
कणकवलीला पूर्वी कोकणकन्या एक्सप्रेस 7.52 आणि पोहोचायची आता 20जानेवारीपासून ती 6 वाजून 43 मिनिटांनी पोहचेल. सध्या कोकणकन्या एक्सप्रेस दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मडगावला पोहोचते. सुपरफास्ट झाल्यावर ती दुपारी ऐवजी सकाळी 9.46 मडगावला आपला प्रवास संपवणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news