‘तेजस’ धावणार मडगावपर्यंत; कोकण रेल्वेची माहिती

‘तेजस’ धावणार मडगावपर्यंत; कोकण रेल्वेची माहिती

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेने करमाळी-मुंबई सीएसएमटी 'तेजस' एक्स्प्रेसची सेवा मडगाव जंक्शनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले. गाडी क्रमांक 22119/22120 मुंबई ते करमाळी 'तेजस' एक्स्प्रेस मडगाव जंक्शनपर्यंत 1 नोव्हेंबरपासून धावणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

गाडी क्रमांक 22119 मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन 'तेजस' एक्सप्रेस 1 नोव्हेंबरपासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबई सीएसएमटी येथून 5.50 वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला पोहोचेल. त्याच दिवशी 14.40 वाजता पोचणार. रेल्वे क्र. 22120 – मडगाव जं. मुंबई सीएसएमटी 'तेजस' एक्सप्रेस मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी 1 नोव्हेंबरपासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 15.15 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी मुंबई सीएसएमटीला 23.55 वाजता पोहोचेल. गाडी दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी स्थानकावर थांबेल.

गाडीची सुधारित रचना

दि. 15 सप्टेंबर पासून एक व्हिस्टा डोम कोच जोडला जाईल. यावेळी एकूण 15 एलएचबी कोचच्या सुधारित रचनेसह ट्रेन धावेल : ए सी
चेअर कार – 11 कोच, एक्झिक्युटिव्ह चेअर कार – 1 कोच, व्हिस्टा डोम – 1 कोच, जनरेटर कार – 2 असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news