रत्नागिरी : साई रिसॉर्ट पाडण्याबाबत नियोजन करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश | पुढारी

रत्नागिरी : साई रिसॉर्ट पाडण्याबाबत नियोजन करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री अनिल परब यांच्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या दापोली-मुरुड येथील साई रिसॉर्टसह सी कॉन रिसॉर्ट शासकीय नियमानुसार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सोमवारी आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरींग कमिटीची बैठक जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्र शासनाने दिलेल्या स्पष्ट सूचना केल्याप्रमाणे राज्य कोस्टल झोन मॉनिटरींग कमिटीने शासकीय नियमानुसार साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बांधकाम विभागाला रिसॉर्ट पाडण्याचे नियोजन करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. बांधकाम विभाग लवकरच नियोजन करून त्याबाबतची कारवाई करेल असे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी स्पष्ट केले. माजी पालकमंत्री असलेल्या अ‍ॅड. अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेली दीड-दोन वर्ष वादग्रस्त ठरलेले हे रिसॉर्ट लवकरच जमीन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

Back to top button