रत्नागिरी : कोकणातील धरणसाठा अव्वल! 51 धरणे ओव्हरफ्लो; 3 दिवस मुसळधार शक्य | पुढारी

रत्नागिरी : कोकणातील धरणसाठा अव्वल! 51 धरणे ओव्हरफ्लो; 3 दिवस मुसळधार शक्य

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जुलै अखेर खंड पडलेल्या पावसाचा जोर ऑगस्ट महिन्यातील श्रावणधारांच्या जोरांनी वाढल्याने कोकणातील धरणसाठा अन्य विभगाच्या तुलनेने अव्वल ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात बहुतांश भागात सध्या पावसाचा जोर कमी होत असला, तरी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मात्र पुढील दोन-तीन दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे कोकणातील बहुतांश धरणे तुडूंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसर्‍या टप्प्याच्या सुरुवातीलाच धरणांमध्ये एकूण 88 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये तब्बल दुपटीने पाणी असून कोकणातील जलसाठा अन्य विभागाच्या तुलनेने अव्वल ठरला आहे. दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावाधीत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसामुळे सध्या कोकणातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसर्‍या टप्प्याच्या सुरुवातीलाच धरणांमध्ये एकूण 88 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये तब्बल 19 टक्के अधिक पाणी आहे. पावसाच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये पावसाने दडी मारली होती. संपूर्ण महिन्यात तुरळक ठिकाणीच पाऊस झाला होता. त्यामुळे पाण्याबाबत तीव्र संकटाची स्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने काही दिवसांतच चित्र पालटले.

कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागांत अतिवृष्टीही झाली. जुलैच्या तिसर्‍या आठवड्याच्या अखेपर्यंत सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जुलै अखेरीस कोकणातील पाणीसाठ्यात तब्बल 40 ते 45 टक्क्यांची भर पडून पाणीसाठा 88 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून तो अन्य विभगाच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 64 छोटी आणि 3 मध्यम प्रकल्पांपैकी 51 धरणे सध्या ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामध्ये राजापुरातील अर्जुना या मध्यम प्रकल्पाचाही समावेश आहे. शुक्रवारी 41.56 जिल्ह्यात मि.मी. सरासरी पाऊस पावसाचा जोर ओसरलेला असला तरी शुक्रवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 41.56 मि.मी.च्यासरासरीने 374 मि.म ी. एकूण पावसाची नोंद झाली. या मध्ये मंडणगड तालुक्यात 47 मि.मी. दापोली 42, खेड 48, गुहागर 16, चिपळूण 36, संगमेश्वर 50, रत्नागिरी 15, लांजा 83 आणि राजापूर तालुक्यात 37 मि. मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 2634 मि. मी.च्या सरासरीने 23 हजार 713 मि. मी. एकूण पाऊस झाला आहे.

Back to top button