रत्नागिरी: दारूबंदी, विधवा प्रथा निर्मूलनाचा निर्धार | पुढारी

रत्नागिरी: दारूबंदी, विधवा प्रथा निर्मूलनाचा निर्धार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  दारूच्या व्यसनाधीनतेमुळे निर्माण होणार्‍या सामाजिक समस्या सोडविण्याबरोबरच विधवा कुप्रथा सोडवण्यासाठी कोकणातील सर्व गावातून ग्रामरक्षक दलांना सक्रिय करण्यात येणार आहे. यासाठी येत्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी कोकणातील प्रत्येक गावात होणार्‍या ग्रामसभेत ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून त्याचा जागर करण्यात येणार आहेे.

महाराष्ट्र ग्रामरक्षक दल नियम 2017 बाबत असलेल्या तरतुदीला व्यापक प्रसिद्धी देऊन अधिकाधिक ग्रामरक्षक दले स्थापन व्हावीत, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना ग्रामरक्षक दल स्थापनेबाबत प्राधान्याने पत्र पाठवून येत्या स्वातंत्र्यदिनी होणार्‍या ग्रामसभा प्राधान्याने ग्रामरक्षक दलाच्या माहितीचा प्रसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण भागांत अवैध मद्य निर्मिती व विक्री यावर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी गावांमधून लोकसहभागातून स्थानिक पातळीवर ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेची तरतूद दारूबंदी कायद्यात केली आहे. महाराष्ट्र ग्रामरक्षक दल नियम 2017 बाबत असलेल्या तरतुदीला व्यापक प्रसिद्धी देऊन अधिकाधिक ग्रामरक्षक दल स्थापन व्हावे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना ग्रामरक्षक दल स्थापनेबाबत प्राधान्याने पत्र लिहिण्याबाबत नुकतेच निर्देश दिले आहेत.

येत्या 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत प्रत्येक गावात होणार्‍या ग्रामसभेच्या विषय सूचीमध्ये ग्रामरक्षक दल स्थापनेबाबत विषय समाविष्ट करण्याबाबत या पत्राद्वारे कळविण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. तसेच दारूबंदीबरोबरच विधवा कुप्रथांचा विरोधही ही पथके गावागावांतून लोकजागर करणार आहेत.

स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा
उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामरक्षक दलांचा घेणार सहभाग
जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना ग्रामरक्षक दल स्थापनेबाबत प्राधान्याने पत्र

Back to top button