रत्‍नागिरी : कोकणकन्या एक्सप्रेस अखेर विद्युत इंजिनसह धावली | पुढारी

रत्‍नागिरी : कोकणकन्या एक्सप्रेस अखेर विद्युत इंजिनसह धावली

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा मुंबई – मडगांव कोकणकन्या एक्सप्रेसने निवसर – आडवलीपासूनचा पुढील प्रवास इलेक्ट्रिक लोकोसह केला. कोकणकन्या एक्सप्रेस रत्नागिरीपासून पुढील प्रवासाला निघाली असता आज (रविवार) निवसर आडवली दरम्यान या गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पुढील प्रवासासाठी इलेक्ट्रिक लोको जोडावे लागले.

दि.१ मे पासून कोकण रेल्वे मार्गावरील दहा गाड्या विद्युत इंजिनसह धावणार होत्या. मात्र काही कारणामुळे हा मुहूर्त लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र कोकण रेल्वेने काही कारण सांगून हा मुहूर्त तूर्त लांबणीवर टाकला आहे.

रविवारी सकाळी कोकणकन्या एक्सप्रेसचे इंजिन निवसर ते आडवली दरम्यान फेल झाले. या नंतर याचवेळी या मार्गांवरून धावणाऱ्या मालगाडीचे इलेक्ट्रिक इंजिन काढून ते कोकणकन्या एक्सप्रेसला जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना करण्यात आली.

Back to top button