रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल : पाच तालुक्यांचा निकाल १०० टक्के | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल : पाच तालुक्यांचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात कोकण बोर्डाचा 99.81 तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.92 टक्के लागला. जिल्यातील पाच तालुक्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

जिल्ह्यात 17 हजार 668 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यातील 17 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 8925 मुले तर 8743 मुलींचा समावेश आहे.

जिल्ह्यात गुहागर तालुक्यात 1 हजार 54, लांजा तालुक्यात 1 हजार 115, मंडणगड तालुक्यात 570, राजापूर तालुक्यात 1 हजार 504 आणि संगमेश्‍वर तालुक्यात 1 हजार 815 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या तालुक्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

चिपळूण तालुक्यात 3 हजार 737 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 736 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याचा निकाल 99.97 टक्के लागला आहे.

दापोली तालुक्यात 1 हजार 621 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 हजार 617 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याचा निकाल 99.75 टक्के लागला आहे. खेड तालुक्यात 2 हजार 311विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 309 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.

रत्नागिरी तालुक्यात 3 हजार 955 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 3948 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्याचा निकाल 99.82 टक्के लागला आहे.

Back to top button