जालना : २४ तासांत १५ मि.मी. पाऊस; भोकरदन तालुक्यात सर्वाधिक नोंद, पिकांना मोठा फायदा | पुढारी

जालना : २४ तासांत १५ मि.मी. पाऊस; भोकरदन तालुक्यात सर्वाधिक नोंद, पिकांना मोठा फायदा

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली असून मागील 24 तासांत 15.30 मिमी पाऊस झाला आहे. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक नोंद झाली आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे होते. आषाढीच्या दिवशी शेतकर्‍यांना विठ्ठल पावला. यावर्षी हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज फोल ठरला आहे. यामुळे जून महिना कोरडाठाक गेला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस नव्हता. यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या होत्या. गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. यामुळे पेरण्या जवळपास पूर्ण होत आल्या आहे. रिमझिम पाऊस व ठिंबक सिंचनावर लागवड केलेल्या पिकांनाही जीवनदान या पावसामुळे मिळाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेले नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून पाऊस सुरू झाला होता. हा पाऊस दिवसभर सुरू आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात 15.30 मि.मी. पावसाची नोंद झाली. भोकरदनतालुक्यात सर्वाधिक 32.90 मिमीपाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातसर्वाधिक कमी पाऊस (2.40) मिमीझाला आहे. मागीलचौवीस तासांतजालना 19.90, बदनापूर 23.30,भोकरदन 32.90, जाफराबाद 8.90,परतूर 11.30, मंठा 13.10,अंबड5.60, घनसावंगी 2.40 मिमीपावसाची नोंद करण्यात आली आहे.या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे.यंदा जिल्ह्यात सहा लाखहेक्टरवर खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित आहे.या पैकी 10 जुलैपर्यंत जिल्ह्यात 75टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

पावसाची आकडेवारी (पाऊस मि.मी.) तालुका वार्षिक सरासरी अपेक्षित पाऊस 10 जुलैपर्यंत

जालना 643.80 201.85 287.40                                                                                                                बदनापूर 598 166.58 214.40
भोकरदन 546.50 181.40 253
जाफराबाद 579.60 189.20 318
परतूर 650.80 192.83 1080.80
मंठा 677.50 226.20 308.40
अंबड 594.50 192.83 195.80
घनसावंगी 638.40 201.10 195.80

Back to top button