Information Technology Act
ग्राहकाचा मोबाईल क्रमांक अन्यत्र वापरल्यास कारावास : तिवारीFile Photo

Information Technology Act | ग्राहकाचा मोबाईल क्रमांक अन्यत्र वापरल्यास कारावास : तिवारी

Information Technology Act | आपण कुठल्याही दुकानातून वस्तू खरेदी केली, हॉटलेमध्ये जेवण जरी केले तरी मोबाईल क्रमांक मागितला जातो.
Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आपण कुठल्याही दुकानातून वस्तू खरेदी केली, हॉटलेमध्ये जेवण जरी केले तरी मोबाईल क्रमांक मागितला जातो. तुम्ही जर असे करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, तुम्ही दिलेला मोबाईल क्रमांक तुमच्या; म्हणजेच ग्राहकाच्या संमतीशिवाय इतरत्र वापर करणे, ही व्यक्तीशी असलेल्या कायदेशीर कराराचा भंग आहे.

Information Technology Act
Pune Rain Update | पुणे शहरावर क्युम्युनोलिंबस ढगांची गर्दी

ग्राहकाची वैयक्तिक माहिती उघड करणे, हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्याने ग्राहकांचे नुकसान झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा अथवा पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याबाबत कायद्यात तरतूद असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी सांगितले.

वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच रेस्टॉरंट किंवा कॉफी दुकानात देयक तयार करताना ग्राहकांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक नसून कोणीही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहनही तावरे यांनी केले आहे.

Information Technology Act
भीषण अपघातात ७ ठार, बागेश्‍वर धामला जाणार्‍या भाविकांवर काळाचा घाला

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या २६ मे २०२३ रोजीच्या सूचनेप्रमाणे ग्राहकांनी शॉपिंग मॉल, किरकोळ व्यापाऱ्यांकडे वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफीच्या दुकानात ग्राहकांनी सेवा घेतल्यानंतर शेवटी देयक तयार करताना भ्रमणध्वनी देणे बंधनकारक नाही.

माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ७२ अ अंतर्गत वस्तू विक्रीच्या वेळी मिळालेल्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा ग्राहकाच्या संमतीशिवाय इतरत्र वापर करणे हा कराराचा भंग आहे. वैयक्तिक माहिती उघड करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे जर ग्राहकाचे नुकसान झाले तरी शिक्षेची, दंड करण्याबाबत कायद्यात तरतूद असल्याचीही माहिती तावरे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news