बेळगाव : चिंचणी टोल नाक्याला मिनी लॉरीची भीषण धडक | पुढारी

बेळगाव : चिंचणी टोल नाक्याला मिनी लॉरीची भीषण धडक

चिकोडी ; पुढारी वृतसेवा : निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर चिकोडी तालुक्यातील चिंचणी टोलगेटला मिनी लॉरीने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कठडे तोडत ही मिनी लॉरी टोल केबीन जवळ थांबली. यावेळी टोल केबीन जवळील लोकांची पळापळ झाली. दरम्‍यान चालक व टोल कर्मचारी या अपघातातून थोडक्‍यात बचावले.

अपघातातील मिनी लॉरी ही चिकोडी शहरातील असल्याचे समजते. लॉरी चालक उदय कुंभार व इतर दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. वाळू भरून घेऊन अतिवेगाने जात असलेली मिनी लॉरी चालकाचे नियंत्रण सुटल्याने टोलगेटला धडकल्‍याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे टोलगेटचे देखील मोठे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कोणाचाही मृत्‍यू झाला नाही. या प्रकरणी चिकोडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button