हिंडलगा कारागृहाचे जेलर यांच्या घरावर एसीबीचा छापा | पुढारी

हिंडलगा कारागृहाचे जेलर यांच्या घरावर एसीबीचा छापा

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : हिंडलगा कारागृहाचे अधीक्षक (जेलर) कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर बंगळूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) बुधवारी छापा टाकला. तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांना बंगळूरच्या परप्पन अग्रहारा कारागृहात कृष्णकुमार यांनी व्हीआयपी सेवा दिली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.

हिंडलगा कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांचे घर हनुमान नगरमध्ये आहे. बुधवारी बंगळूरच्या एसीबी पथकाने बेळगावच्या एसीबी अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांच्या त्यांच्या या घरावर छापा टाकून चौकशी केली.

कृष्णकुमार यांनी बंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृह म्हणून सेवा बजावली होती. त्या काळात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्ती असणार्‍या शशिकला यांना भ्रष्टाचाराप्रकरण सदर कारागृहात ठेवण्यात आले होते. यावेळी शशिकला यांना व्हीआयपी सुविधा देण्यात आली होती. याप्रकरणी आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. त्या चौकशीसाठी बंगळूर एसीपी पथक चौकशीसाठी बेळगावात दाखल झाले आहे.

स्थानिक अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगळूर येथे एसीबी अधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर माहिती घेतली. याप्रकरणी बंगळूर येथे तक्रार दाखल करण्यात आल्याने बंगळूरसह बेळगावमध्ये कारागृह निरीक्षक कृष्णकुमार यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात येत असल्याचे सांगितले.

Back to top button