दोन कोटींच्या मूर्तीची चोरी | पुढारी

दोन कोटींच्या मूर्तीची चोरी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कचनेर जैन मंदिरातून भगवान पार्श्वनाथ यांची दोन कोटी रुपये किमतीची सोन्याची मूर्ती चोरी केल्याचा एका नोकरावर संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मागावर चिकलठाणा पोलिसांची दोन पथके मूर्तीचोरांच्या तपासासाठी राज्याबाहेर रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. पोलिस अधीक्षक मनोज कलवानीया यांनी रविवारी (दि.25) मंदिर परिसरास भेट देवून पाहणी केली.

जैन धर्मीयांचे अतिशय तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरात समाजबांधवांनी दोन किलो वजनाच्या पार्श्वनाथ चिंतामणी यांच्या सुवर्ण मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. शनिवारी पार्श्वनाथ चिंतामणी यांची जयंती असल्याने मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी पुजार्‍याला मूर्तीचा रंग निघत असल्याचे निर्दशनास आले.

Back to top button