खोटे सोने देऊन दहा लाखांना गंडा; पत्नीसह मुलाविरोधात गुन्हा दाखल

खोटे सोने देऊन दहा लाखांना गंडा; पत्नीसह मुलाविरोधात गुन्हा दाखल
Published on
Updated on

परतूर, पुढारी वृत्तसेवा : कमी पैशांत एक किलो सोने देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला दहा लाख रुपयांना गंडविल्याची खळबळजक घटना सोमवारी (दि. 11) उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पती-पत्नीसह त्यांचा मुलगा अशा तिघांविरोधात परतूर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शामराव पवार, त्याची पत्नी, एक मुलगा (रा. खुरानपूर, ता. लोणार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार गोरख रावसाहेब लांब (वय 32, रा. तांबवा, ता. केज., जि.बीड) यांच्या गावाजवळच महादेव कोल्हे (15) हा मुलगा राहतो. महादेव व आरोपीची फेसबुकवर मैत्री झालेली आहे. शेतामध्ये खोदकाम करताना मला सोन्याचा एक हंडा सापडलाअसून तो विकायचा आहे. तुला खूप कमी किमतीत मी तो देईल, तू एकदा मला परतूर रेल्वे स्टेशनच्यापुलाजवळ येऊन भेट. मी तुला या ठिकाणी ते सोन्याचे सॅम्पल दाखवितो. याबाबत आरोपीने महादेव याला वारंवार फोन करूनसोने खरेदी करण्याचा आग्रह केला.परंतु सोने खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने महादेवने याबाबतची माहिती गोरख लांब यांना सांगितली. त्यानंतर महादेव याने आरोपीचा मोबाईल क्रमांकही गोरख यांना दिला.

त्यानंतर गोरख यांनी आरोपीला फोन केला असता आपण परतूर रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ या. त्या ठिकाणी तुम्हाला मी सोने दाखवितो, असे आरोपीने यावेळी गोरख यांना सांगितले. दरम्यान, 23 एप्रिल 2022 रोजी केजवरून गोरखसह अन्य एक मित्र कारने परतूर येथे रेल्वेजवळ आले. या ठिकाणी आरोपीने या दोघांना सोन्याच्या नाण्याचे एक ग्रॅमचे सॅम्पल दाखवून ते खरे वाटले तर तुम्ही खरेदी करा, नसता करू नका, असे म्हणून एक किलो सोने मी तुम्हाला दहा लाख रुपयांत देतो, असे सांगून गोरखसह मित्राला आरोपीने विश्‍वासात घेतले. आरोपीसोबत त्याची पत्नी, मुलगा
होता. त्यानंतर गोरख याने हे सोने स्वतः जवळ घेऊन त्याची पारख सोनाराकडे केली असता ते सोने खरे असल्याने सोनाराने सांगितले. त्यानंतर गोरख यांनी 4 मे रोजी वाटूर येथे आरोपीची भेट घेतली. एका बॅगमध्ये असलेले सोने आरोपींनी गोरख यांना दाखविले. आमच्याजवळ सध्या दहा लाख रुपये नाहीत. सध्या आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये देतो. पैशांची जमावाजमवी झाल्यानंतर उर्वरित पैसे देतो, असा व्यवहारआरोपीसोबत गोरख यांचा ठरला.

आरोपींनी केले मोबाईल बंद
ठरल्याप्रमाणे 7 मे रोजी 2022 रोजी कारने पुन्हा गोरख व त्याचा मित्र वाटूरजवळ गेले. आरोपींची भेट घेऊन त्यांनी आरोपीला दहा लाखु रुपये देऊन त्या मोबदल्यात एक किलो सोने घेतले. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आरोपी व गोरख व त्याचा मित्र हे सर्व जण आपापल्या गावी परत आले. दुसर्‍या दिवशी गोरख यांनी सोनाराकडे या सोन्याची खातरजमा केली असता ते खोटे असल्याचे कळाले. त्यानंतर मात्र गोरख यांना प्रचंड संताप आला. त्यांनी आरोपींना फोन लावला. परंतु त्यांचा फोन बंद होता. आता आपली फसवणूक झाली असल्याचे गोरख यांना कळाले. या प्रकरणी गोरख लांब यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news