औरंगाबाद : वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला | पुढारी

औरंगाबाद : वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा ः शिवना नदीतून वाळूची चोरटी वाहतूक करणारा गुन्हे शाखेच्या पथकाने लासुरगाव शिवारात शुक्रवारी पडकला. पथकाने 5 लाख रुपयांचा ट्रक्टर व एक ब्रास वाळू असा 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जीवन शेखलाल छानवाल (वय 25, रा. परसोडा, ता.वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शिवना नदीतून वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. या ठिकानाहून ट्रक्टरमधून वाळूची वाहतुक सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकासह वैजापूर ठाण्याचे योगेश झाल्टे, श्कुल बनकर, पाडळे यांनी लासूरगाव शिवारात सापळा लावला होता. नदीतून वाळू घेवून येत असलेला विना क्रमांकाचा ट्रक्टर पथकाने अडविला. चालक छानवाल याने वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगत ती चोरून आणल्याचे सांगितले.

या प्रकरणी वाल्मिक निकम यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांत जीवन छानवाल (रा. परसोडा) याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button