औरंगाबाद : पोलिस जावयाला बेदम मारहाण | पुढारी

औरंगाबाद : पोलिस जावयाला बेदम मारहाण

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा: घरगुती वादातून पोलिस जावयाला काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 20 जूनला लक्ष्मी कॉलनीत ही घटना घडली. या प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद राधाकृष्ण वाहुळ (34, रा. लक्ष्मी कॉलनी) असे मारहाणीत जखमी झालेल्या पोलिस जावयाचे नाव आहे.

आनंद वाहूळ यांचे पत्नीसोबत भांडण झाले होते. यावरून पत्नीने तिच्या माहेरच्या मंडळींना फोन करून बोलावून घेतले. वाहूळ यांचे मेव्हणे सुजीत सुरेश बनसोडे, संदीप ऊर्फ गुड्डू बनसोडे, सासू शोभा सुरेश बनसोडे यांनी वाहूळ यांना आमच्या मुलीशी का भांडतो, असे म्हणत शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. तसेच त्यातील एकाने वाहूळ यांना काठीने मारहाण केली. यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी फ—ॅक्चर झाली.

हेही वाचलंत का? 

Back to top button