औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार; तरूणावर गुन्हा दाखल

कुटुंब कलह
कुटुंब कलह

पैठण ; पुढारी वृत्तसेवा 

रांजणगाव शिरूर (जि. पुणे) येथील एका २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी फारोळा (ता. पैठण) येथील एका तरूणावर कारवाई केली आहे. त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर तरूणी चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. ती एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी रांजणगाव गणपती शिरूर (जि. पुणे) या ठिकाणी रहात होती. ती एका कामानिमित्त मुंबई यथे गेली असता अविनाश नामदेव अहिरे या तरूणासोबत तिची ओळख झाली. अविनाश हा मुळचा रा. गणोरी (ता. अकोले जि. अहमदनगर) येथील रहिवाशी आहे.

त्यांच्या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाल्याने, त्यांचे नेहमी फोनवर बोलणं होत होते. यानंतर अविनाश याने या तरुणीला नाशिक, फारोळा, रांजणगाव येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केले. १४ मे २०२२ रोजी पीडित तरुणीने अविनाश राहत असलेल्या फारोळा (ता. पैठण) येथे येऊन अविनाशला लग्न करण्याची विनंती केली. मात्र अविनाशने या तरुणीला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

अविनाशने या तरुणीला नाशिक, फारोळा, रांजणगाव येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. दि. १४ मे ला २०२२ रोजी पीडित तरुणीने अविनाश राहत असलेल्या फारोळा (ता.पैठण) येथे येऊन त्याला लग्न करण्याची विनंती केली. मात्र अविनाशने या तरुणीला मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असा स्पष्ट नकार दिला. त्यानंतर अविनाशने या पीडित तरुणीला बेदम मारहाण करत, तिला घराबाहेर हाकलून दिले. यामुळे सदर पीडित तरुणीने गुरुवारी (दि.२६) रात्री बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे प्रमुख संतोष माने, सपोनि जनाबाई सांगळे यांनी बिडकीन येथील महिला दक्षता समितीच्या सदस्य लताबाई सर्जेराव शिंदे यांच्यासमक्ष पीडित तरुणीचा जबाब घेऊन तरूणावर अत्याचारसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल हे करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news