औरंगाबाद : लग्न झालेला मित्र हनिमूनला अन् लग्नात तलवार नाचवणारा कोठडीत | पुढारी

औरंगाबाद : लग्न झालेला मित्र हनिमूनला अन् लग्नात तलवार नाचवणारा कोठडीत

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : मित्राच्या लग्नात तलवार घेऊन नाचणाऱ्या एकाला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बुधवारी (दि.२७) ही कारवाई करण्यात आली. सूर्यकांत गीताराम शिंगाडे असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, ज्याच्या लग्नात तो तलवार घेऊन नाचला, तो तर आता हनिमूनला गेला, पण याला मात्र चक्क कोठडीची हवा खावी लागली आहे.

मित्राच्या लग्नात चक्क तलवारी-कोयते घेऊन नाचत असल्याचा एक व्हिडिओ औरंगाबादमध्ये समोर आलाय. औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागातली ही घटना आहे. तलवार, कोयता घेऊन मित्राचा लग्नात नाचणाऱ्या मित्राला पोलीस ठाण्याची हवा खावी लागलीय. ज्याच्या लग्नात डान्स केला, तो सध्या हनिमूनला गेलाय, तर तलवारी घेऊन नाचणाऱ्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सूर्यकांत गीताराम शिंगाडे असे या तरुणाचं नाव आहे. औरंगाबाद शहरातील प्रतापनगरमध्ये त्याच्या मित्राचे लग्न होते. त्या लग्नात सूर्यकांतने मित्राच्या खांद्यावर बसून थेट तलवार घेऊन नाचू लागला. या डान्सचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावरही टाकला. या व्हिडिओवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button