भरधाव आयशरच्या धडकेत पोलीस पाटील जागीच ठार | पुढारी

भरधाव आयशरच्या धडकेत पोलीस पाटील जागीच ठार

आडूळ, पुढारी वृत्तसेवा : हर्षीहून कामानिमित्त औरंगाबाद येथे जात असताना दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशरने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. ही घटना औरंगाबाद बीड राष्ट्रीय महामार्गावर आडूळ शिवारात घडली, नारायण पंडित राऊत (वय ७०) रा हर्षी, ता पैठण असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पैठण तालुक्यातील हर्षी येथील रहिवासी पोलीस पाटील नारायण पंडित राऊत हे त्यांच्या दुचाकी क्र. एम एच २० इक्यू ५४०४ ने कामानिमित्त औरंगाबाद येथे जात होते. त्यांची दुचाकी आडूळ शिवारात येताच बीडकडून औरंगाबादकडे भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर क्र. एच आर ३८ ए बी ९४७७ ने राऊत यांच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

हि धडक इतकी भीषण होती की आयशरने स्कुटीला लांबपर्यंत फरफटत नेले. या अपघातामुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button