नांदगाव : जिल्ह्यातील प्रारंभीपासूनच हायहोल्टेज लढत ठरलेल्या नांदगाव मतदारसंघात शक्यतेप्रमाणे मतदानाच्या दिवशी राडा झाला. मतदारांना डांबून ठेवल्याच्या आरोपावरून अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी उमेदवार सुहास कांदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यातून दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी कांदे यांनी भुजबळांना 'आज तुझा मर्डर फिक्स', अशी खुली चेतावणी दिल्याचा आरोप भुजबळ गटातर्फे करण्यात येत आहे. तर नांदगाव-मनमाड रस्त्यावर आ. कांदे आणि भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा बघायला मिळाला.
नाशिक जिल्ह्यातील प्रारंभीपासूनच हायहोल्टेज लढत ठरलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात शक्यतेप्रमाणे मतदानाच्या दिवशी राडा झालाच. मतदारांना डांबून ठेवल्याच्या आरोपावरून अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी समर्थक आणि यंत्रणेसह महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोन्ही गट आमने-सामने येऊन झालेल्या गोंधळात कांदे यांनी थेट भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. 'आज तुझा मर्डर फिक्स', अशी खुली चेतावणी दिली गेल्याचा आरोप भुजबळ गटातर्फे करण्यात येत सुहास कांदे समीर भुजबळांना संतापून म्हणाले.
भयमुक्त नांदगाव मतदारसंघ या अजेंड्याभोवती नांदगावची निवडणूक फिरत राहिली. आरोप-प्रत्योरोप, सभा, बैठकांमधून आव्हान-प्रतिआव्हानं आणि तथाकथित धमक्यांची फोडणी कांदे आणि भुजबळ गटाकडून दिली गेली. तोच कित्ता बुधवारी (दि. २०) मतदान प्रक्रियेदरम्यानही घडला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर आमदार कांदे आणि अपक्ष उमेदवार भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा बघायला मिळाला. कांदे यांनी मतदारांना बोलावून त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप भुजबळ यांच्याकडून करण्यात आला, तर मतदार मतदानाला जात असताना त्यांना अनाधिकाराने अडवल्याचा आरोप कांदे समर्थकांकडून करण्यात आला.
याठिकाणी कांदे दाखल झाल्यानंतर आमदार कांदे व भुजबळ एकमेकांच्या अंगावर धावून जात बाचाबाची झाली. दोन्ही गट आमने-सामने आल्याने पोलिस प्रशासनाची एकच धांदल उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घटनास्थळी मनमाडचे पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा दाखल झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गट माघारी फिरले. तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने हे दिवसभर नांदगावमध्ये तळ ठोकून होते. जीवे मारण्याची धमकी कांदेशी निगडित शैक्षणिक संस्थेच्या आवारातून मोठ्या संख्येने मतदार निघाले. या मतदारांविषयी भुजबळ गटाने आक्षेप घेतला. याठिकाणी कांदे दाखल झाल्यानंतर वातावरण अधिकच गरम झाले. एकमेकांना आव्हान दिले गेल्यातून कांदे यांनी 'आज तुझा मर्डर फिक्स' असे वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. त्याविषयी भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, असं कुणाचे नाव घेऊन बोललो नसल्याचे स्पष्टीकरण कांदे यांनी दिले आहे.
गुरुकुल कॉलेजजवळ घडलेल्या प्रकारानंतर आमदार कांदे आणि अपक्ष उमेदवार भुजबळ यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंगप्रकरणी नांदगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. मनमाड-नांदगाव रस्त्यावर भुजबळ आणि कांदे यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांचा जमाव केला होता. त्यामुळे लक्झरी बस (एमएच ४३ एच ९२९२) व इतर दोन ते तीन पिकअप वाहनांमधून मतदानासाठी निघालेल्या मतदारांची अडवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहेत.