

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू आहे. पहिल्या कलानुसार महायुतीने स्पष्ट बहुमताकडे आघाडी घेतली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. १२२ जागा घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचा हा कौल कसा मानवा ? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. लोकशाहीत जय पराजय होत असतो. परंतु, या निकालावर माझा विश्वास नाही. निवडणुकीत काहीतरी गडबड आहे. विधानसभेच्या निकालावर गौतम अदानींचा प्रभाव आहे का ? असा प्रश्न आहे. 100 टक्के निकाल लावून घेतला आहे. हा जनतेचा कल नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गौतम अदानी यांनी हा निकाल ठरवून लावून घेतला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
निकालाच्या पाठीमागे खून मोठे कारस्थान आहे. महाराष्ट्रातील जनता, शेतकरी या निकालावर नाराज आहेत. लाडकी बहिणीपेक्षा लाडका भाऊ, लाडका काका, नाराज आहेत.