

नंदुरबार : पुढारी ऑनलाईन डेस्क - “पंतप्रधान मोदी हे सर्व आदिवासींना वनवासी म्हणतात, ते तुमचे अधिकार हिरावून घेत आहेत. तुमची जमीन, पाणी, जंगल घेऊन अरबपतींना दिले जात आहे. आदिवासी म्हणजे भारताचे पहिले मालक आहेत. मात्र मोदी म्हणतात की, माझ्या हातातील संविधानाचं पुस्तक कोरं आहे. ज्यांनी संविधान वाचलं नाही त्यांना ते कोरं वाटतं,” अशा शब्दांत राहुल गांधींनी निशाणा साधला.
नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे नंदुरबार दौऱ्यावर आले आहेत. मात्र राहुल यांच्या नंदुरबार येथील सभेला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती पहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरातही सभेला अनुपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत फक्त पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित आहेत.
“आदिवासी लोकसंख्या 8 टक्के आहे तर भागीदारी सुद्धा 8 टक्के असली पाहिजे. परंतु या सरकारमध्ये 90 टक्के अधिकारी हे सरकार चालवतात. सरकार 100 रुपये खर्च करत असेल तर आदिवासी अधिकारी फक्त 10 पैशांचा निर्णय घेतात,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.