

अकोला : जिल्ह्यातील अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले. अकोला पूर्व मतदारसंघात अजाबराव टाले (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोला पश्चिम मतदारसंघात डॉ. धनंजय प्रल्हादराव नालट यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे ३ अर्ज दाखल केले.
अकोला पूर्व मतदारसंघात आज २ जणांनी ८ अर्जांची उचल केली. आतापर्यंत या मतदारसंघात ३५ जणांनी ५८ अर्जांची उचल केली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात आज १८ व्यक्तींनी ४३ अर्जांची उचल केली. आतापर्यंत या मतदारसंघात ६८ व्यक्तींनी १३० अर्ज नेले आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात आज १५ व्यक्तींनी २९ फॉर्मची उचल केली. आतापर्यंत या मतदारसंघात ४२ व्यक्तींनी ९९ अर्जांची उचल केली आहे. अकोट मतदारसंघात आज १५ व्यक्तींनी २५ अर्जांची उचल केली. आतापर्यंत या मतदारसंघात ६४ व्यक्तींनी १०२ अर्जांची उचल केली आहे. बाळापूर मतदारसंघात आज १० व्यक्तींनी २३ अर्जांची उचल केली. आतापर्यंत या मतदारसंघात ४२ व्यक्तींनी ८३ अर्जांची उचल केली आहे.