Maharashtra Assembly Polls | विजयाचा गुलाल नाही उधळला तर फाशी घेईन : शहाजीबापू पाटील

संजय राऊतांना पालथा पाडून तुडवून दाखवणार; खळबळजनक विधान
Maharashtra Assembly Polls |
विजयाचा गुलाल नाही उधळला तर फाशी घेईन : शहाजीबापू पाटीलfile photo
Published on
Updated on

सांगोला : विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन. संजय राऊतांनी दहा सभा घेतल्या तरी त्याला पालथा पाडून तुडवून दाखवणार, असे खळबळजनक विधान येथील आमदार अॅड. शहाजी पाटील यांनी केले. (Maharashtra Assembly Polls)

सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आ. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींशी आ. पाटील बोलत होते. यापूर्वीही गुवाहाटी येथील सत्तानाट्य प्रयोगाप्रसंगी 'काय झाडी, काय डोंगार, सगळं एकदम ओक्केच...' असे विधान केल्याने आ. पाटील चर्चेत आले होते. (Maharashtra Assembly Polls)

आ. पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून मला उमेदवारी मिळाली आहे. सांगोला मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी विजय संपादन करणार आहे. सांगोल्यात पुन्हा एकदा विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन, या मतदारसंघात संजय राऊतांनी दहा सभा घेतल्या तरी त्याला पालथा पाडून तुडवून दाखवणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आ. पाटील यांच्या या विधानाचा ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत कशा पद्धतीने समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Maharashtra Assembly Polls)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news