

नंदूरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क - विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी बुधवार (दि.20) रोजी निवडणूक विभागाकडून १६ विशेष पथक नियुक्ती करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघे 10 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.
आचारसंहितेचा कुठलाही भंग होऊ नये, यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी विशेष पथकांची देखील नियुक्ती करण्यात येणार आहे. या पथकांकडून २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी विशेष काळजी घेतली जाणार असून कोणत्याही ठिाकणी कुठेही गोंधळ होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.