Sanjay Raut | 'माविआ'ला स्पष्ट बहुमत मिळेल! पण 'आम्ही त्यांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवू'

Maharashtra Election Result 2024 : संजय राऊत यांनी निकालापूर्वीच सांगितली रणनिती
Maharashtra Election Result 2024,  Sanjay Raut
'माविआ'ला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Image source- ANI)
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची (Maharashtra Election Result 2024) उद्या शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे की आम्हाला बहुमत मिळेल. आमचे १६०-१६५ आमदार निवडून येतील. पण काहीजण त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही त्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची व्यवस्था केली आहे.'' असे राऊत यांनी म्हटले आहे.

''मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यात शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका असेल. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊ. अजून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही सगळे एकत्र बसून मुख्यमंत्री निवडू..." असे राऊत यांनी पुढे म्हटले आहे.

काँग्रेसच्या हालचाली, बंडखोर नेत्यांशी संपर्क

राज्य विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठणे अवघड असल्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसने हमखास निवडून येणाऱ्या आपल्या बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या पदरात १०१ जागा पडल्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. यात रामटेक मतदारसंघातील बंडखोर राजेंद्र मुळक आणि सोलापूरचे धर्मराव काडादी हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांशी संपर्क साधला आहे.

आबा बागुल, सुरेश जेथलिया, मनीष आनंद, कल्याण बोराडे, जयश्री पाटील, अविनाश लाड या अपक्ष निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी काँग्रेसने संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या बंडखोरांशी महायुतीचे नेतेही संपर्क साधत आहेत. इतरही बंडखोरांना काँग्रेस नेत्यांचे फोन गेले आहेत. रामटेक ही जागा महविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. तेथे काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसची पूर्ण संघटना त्यांचा प्रचार करत होती. ते निवडून येतील, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.

Maharashtra Election Result 2024,  Sanjay Raut
Maharashtra Assembly Polls | सुशीलकुमार शिंदेंवर ही वेळ का यावी?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news