एमआयएमला कार्यकर्ते मिळेना; प्रचार रॅलीत चक्क लहान मुले

Maharashtra Assembly Polls |
Maharashtra Assembly Polls
एमआयएमने रॅलीत गर्दी दिसावी म्हणून चक्क लहान मुलांनाही प्रचारात उतरवले.pudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मध्य मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.९) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची पैठणगेट येथे प्रचार रॅली होती. या रॅलीत प्रचारासाठी चक्क लहान मुलांना उतरण्यात आले. गळ्यात रुमाल आणि हातात फलक घेतलेली ही मुले रॅलीत आघाडीवर होती. मात्र यास विरोध होऊ शकतो, असे लक्षात आल्याने काही अंतर गेल्यावर अचानकपणे मुलांना परत पाठवण्यात आले. (Maharashtra Assembly Polls)

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्रचारानेही जोर धरला आहे. मध्य मतदारसंघात उमेदवारांकडून प्रचार रॅलीव्दारे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे. शनिवारी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ पैठणगेट, खोकडपुरा या भागात पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्रचारानेही जोर धरला आहे. मध्य मतदारसंघात उमेदवारांकडून प्रचार रॅलीव्दारे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे. शनिवारी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ पैठणगेट, खोकडपुरा या भागात पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी सकाळी ११ वाजता एमआयएमचे कार्यकर्ते, पदाधिकारी पैठणगेटवर जमले. मात्र रॅलीत गर्दी दिसावी यासाठी चारचाकी वाहनांमधून २० ते २५ लहान मुलांनाही प्रचारासाठी आणण्यात आले.

MIM party, MIM election campaign, MIM workers, political rally, children's participation, MIM rally, election 2024, MIM Maharashtra, party workers shortage, election rally controversy, MIM political news, rally with children

ही सर्व मुले १० ते १५ वर्षांपर्यंतची होती. त्यांच्या घातलेल्या पांढऱ्या टीशर्टवर एमआयएम नेत्यांची छबी आणि पतंग काढलेले होते. गळ्यात हिरवे रुमाल आणि हातात एमआयएमचेझेंडे घेत ही मुले प्रचार रॅलीत घोषणा देत आघाडीवर होती. मात्र येथील नागरिक, दुकानदारांना हे खटकणार हे लक्षात येताच अचानकपणे या मुलांना रॅलीपासून दूर करण्यात आले. मात्र त्यानंतरही काही मुले घोषणा देत रॅलीत सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news