Maharashtra Assembly Poll : पश्चिममध्ये राजू शिंदेंवर एकला 'चलो'ची वेळ

भाजपकडून छुप्या मदतीची आशा धूसर; शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळतीही सुरूच
Maharashtra Assembly Election 2024
पश्चिममध्ये राजू शिंदेंवर एकला 'चलो'ची वेळFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या प्रमुख निष्ठावंतांनी ऐनवेळी शिदे गटात प्रवेश केला आहे. तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारीही अंतर राखून असल्याने महाविकास आपाडीचे उमेदवार राजू शिदे यांच्यावर एकला चलोची वेळ आली आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना होतो आहे. महायुतीकडून शिंदेच्या सेनेचे आमदार संजय शिरसाट हे निवडणूक रिं- गणात आहेत. ते सलग चौथ्यांदा आमदारकी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या सेनेने राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राजू शिंदे हे आधी भाजपमध्ये होते. ते ऐनवेळी ठाकरे गटात प्रवेश करते झाले आणि त्यासोबतच त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळही पडली. त्यावेळी त्यांना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडूनही छुपी मदत मिळेल असे सांगण्यात येत होते. परंतु आता प्रच ाराने वेग घेतल्यानंतर ही शक्यता धूसर झाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे या एकाच ध्येयाने पेटून भाजपचे सर्व पदाधिकारी सध्या पेटले असून ते संजय शिरसाट यांच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने परिश्रम घेत आहेत,

तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदारसंघात मोठी गळती लागली आहे. सर्वात आधी ठाकरे गटाचे शहरप्रमुख विजय वाघचौरे संजय बारवाल, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, उप तालुकाप्रमुख कैलास भोकरे, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे तसेच संतोष बोर्डे, पवन जैस्वाल, अभिजित पगारे यांसह अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या सेनेत दाखल झाले. त्यानंतर बजाजनगर भागातील शहरप्रमुख सागर शिंदे यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकत्यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्याचा फटका राजू शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे.

मित्र पक्षांच्या मदतीबाबत साशंकता

महाविकास आघाडीत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही पॉश्चम मतदारसंघ स्वतःकडे घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, जागा वाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यामुळे काँग्रेसचे काही इच्छुक इथे नाराज आहेत. तर तिसरा मित्र पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे या मतदारसंघात फारसे संघटनात्मक जाळे नाही. त्यामुळे मित्र पक्षांची किती मदत होते याबाबत साशंकता आहे.

शिरसाटांची बाजू भक्कम

आमदार संजय शिरसाट यांनी गेल्या काही वर्षात सातारा देवळाईसह विविध भागांत शेकडो कोटींची विकास कामे केली. नागरिकांना रस्ते, ड्रेनेज यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे त्यांना जनतेतून पाठिंबा मिळत आहे. ही विकास कामे आणि शिवसेना आणि भाजपची मतपेढी तसेच ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे जाळे या सर्व गोष्टींच्या बळावर आपला विजय सुकर होईल, असा विश्वास शिरसाट यांच्याकडून व्यक्त केला जाती आहे.

तालुकाप्रमुख गायकवाड प्रचारापासून दूर

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड हे प्रचारापासून दूर आहेत. पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी गायकवाड हे देखील इच्छूक होते. परंतु पक्षाने ऐनवेळी भाजपातून आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गायकवाड आणि त्यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी आतापर्यंत प्रचारात कुठेही भाग घेतलेला नाही.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Polls | पश्चिममध्ये ठाकरे गटाची मशाल मंदावली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news