

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : हंबर्डे यांचा फोटो न टाकता एकटेच राजेश पवार यांनी नायगाव मतदारसंघात शहर गावातील हवेतील फुग्यावर लोकसभा उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. आपल्या एकट्याचाच प्रचार करत स्वतःचाच फोटो टाकल्याने राजेश पवार, हे हवेमध्ये एकटेच सवार होऊन लोकसभेला आपल्याच पक्षाच्या घात करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गावा गावात रंगत आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वत्र कर्कश आवाजात भोंगे लावून सर्व जण आपली निशाणी मतदाता यांच्या कानावर घालत आहेत. तसेच आकाशात मोठमोठ्या गावात व शहरात फुग्यात हवा भरून आपले चिन्ह व फोटो टाकून आपला प्रचार हवेतून करताना भाजप व काँग्रेस हे दोनच पक्ष दिसत आहेत. एकीकडे काँग्रेसने लोकसभा उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांचा फोटो फुग्यावर टाकून आपली संस्कृती जोपासली आहे., तर दुसरीकडे आपल्याच तोऱ्यात असलेल्या भाजप उमेदवार राजेश पवार यांनी चक्क एकट्याचाच फोटो छापून लोकसभेच्या उमेदवारांची साथ सोडून दिल्याच्या संदेशाची चर्चा सर्वसामन्यांतून होत आहे.