

निलंगा : काका-पुतण्याच्या लढतीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळेस काका पुतण्याची लढत दिसणार नाही. अशोक पाटील निलंगेकर यांना कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे काका आणि राजकीय प्रतिस्पर्धी अशोक पाटील निलंगेकर यांना कॉंग्रेसने यावेळेस उमेदवारी नाकारली होती. अभय साळुंखे यांना काँग्रेसने इथून उमेदवारी जाहीर केली होती. अशोक पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेत निवडणूक रिंगणातून ते बाहेर पडले आहेत.
निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांची थेट लढत आता काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्याशी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर मतदार कोणाच्या बाजूने कल देतात गेल्या वेळच्या निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर है विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ३२१३१ मतांनी पराभव केला होता.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिवन महाराज रेशमे, डॉ शोभा बेजरगे, जारांगे पाटील यांचे अंबादास जाचव, कालिदास माने, ईश्वर पाटील, विनायक बगदुरे यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतलं त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघात रंगत आली आहे घेट सामना काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच होणार आहे जनतेच कल काय राहील हे पाहणे महत्वचे ठरेल कधी नव्हे तर यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशी होण्याचे चिन्हे आहेत. कारण पहिल्यांदा काँग्रेसने निलंगेकर परिवाराच्या बाहेर उमेदवारी दिल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.