

छत्रपती संभाजीनगर : शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर आता येत्या गुरुवारी (दि. १४) महायुतीचे नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शहरात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधानसभा मतदार संघातील १४ उमेदवारांच्या प्रचारार्थ चिकलठाणा एमआयडीसीतील धूत हॉस्पिटललगत असलेल्या बंद कंपनीच्या मैदानात दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
यावेळी गृहनिर्माणमंत्री तथा पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, राजेंद्र साबळे, प्रवीण घुगे, कचरु घोडके, हर्षवर्धन कराड याची उपस्थिती होती. दहा वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी मोदी शहरात आले होते. त्यांची ही सभा गरवारे स्टेडियमवर झाली होती.
आता गुरुवारीदेखील महायुतीच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील १४ मतदार संघांतील उमेदवारांच्या सभेसाठी ते शहरात येत आहे चिकलठाणा एमआयडीसीतील धूत हॉस्पिटललगत असलेल्या कंपनीच्या खुल्या मैदानावर दुपारी १ वाजता ही सभा होणा असल्याचेही डॉ. कराड म्हणाले. दरम्यान, भाजप-महायुतीने यंदा विधानसभ निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर केले आहे, असे सांगून कराड म्हणाले या सामान्य नागरिकांचा विचार करून योजना आणि विकासकामांचा समावेश केला आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांन सर्वप्रथम सामान्यांचा विकास कसा होईल, यावर भर दिला आहे. त्याच आधारावर सामान्यांसाठी हे संकल्पपत्र तयार केले आहे. यात २५ हजार महिल पोलिस शिपाई भरती, अंगणवाडी ताईंच्या मानधनामध्ये वाढ यासह विवि घोषणांचा समावेश असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
जिल्ह्याचे खासदार असताना इम्तियाज जलील यांनी शहरातील हिंदूबहुल भागात विकासाचे एकही काम केले नाही. तर महायुतीच्या सरकारने सव्वा दोन वर्षात शहरातील हिंदू असो की, मुस्लिम सर्वच भागातील रस्त्यासाठी ६८५ कोटी दिले. कचऱ्याच्या विल्हेवाटसाठी ३४५ कोटी, एवढेच नव्हे तर ५५ दिवसात शहराचा पिण्याच्या पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १६८० कोटींची योजना मंजूर केली. त्यामुळे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विकासावर बोलावे, असे म्हणत आमची लढत या रजाकाराविरोधातच असल्याचे पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.