Aurangabad Assembly Election : आमदार संजय शिरसाट यांची विजयी मिरवणूक सुरू

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांची विजयी मिरवणूक सुरू
Aurangabad Assembly Election
आमदार संजय शिरसाट यांची विजयी मिरवणूक सुरूpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिममधून आमदार संजय शिरसाट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अवघ्या औंरगाबादकरांचे लक्ष लागून राहिले होते की, पश्चिममधून कोण निवडून येणार?. आज सकाळपासूनच मतमोजणीस सुरूवात झाल्यानंतर उमेदवाराबरोबरच जनतेलाही निकालाची प्रतीक्षा लागून राहिली. दरम्यान संजय शिरसाट यांना १ लाख १० हजार १०० मते मिळाल्यानंतर कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. त्यानंतर कार्यकर्त्यानी शिरसाट यांच्या मिरवणुकीला सुरूवात केली.

या निवडणुकीत २६ व्या फेरी अखेर संजय शिरसाट यांना १ लाख १० हजार १०० मतांनी विजयी झाले. तर त्याच्याविरोद्धात उभारलेले मविआचे राजू शिंदे यांना ९५ हजार ५९१ मते मिळाली आहेत. संजय शिरसाट यांची १४ हजार ५०९ मतांची आघाडी मिळाल. यामुळे त्याच्या कार्यकर्त्यांनी मिकवणूक काढत जल्लोष केला. २९व्या फेरीत महायुती संजय शिरसाट यांना 120722 मते, मविआ राजू शिंदे यांना 104898 मते मिळाली. यामुळे संजय शिरसाट यांची 15824 मतांनी आघाडी आहे.

Aurangabad Assembly Election
Aurangabad Gram Panchayat Election : संदिपान भुमरे गटाचे दोन; राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news