जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत व्ही व्ही पॅट कंट्रोल युनिट अशा एकूण वीस यंत्रणा बदलण्यात आली आहेत, मात्र याचा मतदानावर कोणताही परिणाम झालेला नाही
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रांमध्ये चार हजार चारशे पंधरा मतदान यंत्र 4783 व्ही व्ही पॅट यांच्या माध्यमातून बुधवार (दि.20) रोजी सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली, मात्र दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर यंत्रणेत तांत्रिक कारणामुळे मशीन व व्ही व्ही पॅटमध्ये बिघाड झाल्यामुळे तत्काळ त्या ठिकाणी बदलण्यात आल्या. अशा एकूण वीस मशीन बदलण्यात आल्याची माहिती मतदान केंद्रावरील अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे व याला जिल्हा प्रशासनाने ही होकार दिलेला आहे.