पुढारी ऑनलाईन डेस्क: महाविकास आघाडीचे सरकार येणारच नाही, सरकार आमचेच येणार. त्यामुळे आम्ही सुरू केलेल्या योजना या कायम राहतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टच सांगितले. शिंदेंच्या सेनेचे आणि महायुतीचे ओवळा-माजिवडा मतदारसंघातील उमेदवार प्रताप सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.२५) माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, महायुतीत कुठेही वादविवाद नाहीत. लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट चांगला होता. निवडणुकीत मविआ आणि महायुतीच्या कामाची तुलना होईल. विकासाच्या योजना आम्ही आणल्या. त्यामुळे जनता युतीला कामाची पोचपावती देईल. धनुष्यबाण फेक नरेटिव्हवर भारी पडेल, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कोकणात एकही ठाकरेचा उमेदवार दिसणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.