

वडीगोद्री : माजी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दोघांमध्ये विशेष चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलं आहे. तो एका छताखाली यावं यासाठी माझा प्रयत्न आहे. मनोज जरांगे यांचाही तोच प्रयत्न आहे. तुमचा आणि आमचा एकच शत्रू आहे तो म्हणजे भाजप. त्यामुळं उद्धिष्ट एक असताना वेगवेगळे लढलो तर एक वेगळा मॅसेज समाजात जाऊ शकतो. त्यामुळं आपण एकत्र यायला हवं.
स्वराज्य हा आता राजकीय पक्ष झाला आहे. आपण एकसंध कसं राहू शकतो. अपक्ष उमेदवारांचा धोका कसा आहे. आपण कसं पुढे जाऊ शकतो याची चर्चा झाली. हा लढा इथपर्यंत आणलेला आहे. आता लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत आला आहे. स्वराज्य हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे.त्याचा तुम्ही विचार करावा असं मी जरांगे पाटलांना सांगितलं असल्याचे यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले.
लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा.संभाव्य धोक्याविषयी मी त्यांच्या कानावर घातलं आहे. याच्यातून काहीतरी मार्ग निघावा. निवडणुकीपूर्वीची ही शेवटची भेट आहे. याभेटीची गोड भेट व्हावी. ज्यांना नमवायचंय ज्यांनी अन्याय केला तो पक्ष एकच आहे मग वेगवेगळे का लढायचं हेच सांगण्यासाठी आलो होतो. असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले.