उल्हासनगर: पुढारी वृत्तसेवा: उल्हासनगरमध्ये अखेर भाजप आणि शिवसेनेची समेट बैठक पार पडली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने भाजप आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचे काम करण्यास नकार दिला होता. अखेर वरिष्ठांनी हस्तक्षेप करून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाद मिटवला.
यासंदर्भात भाजप आणि शिवसेनेने एक समेट बैठक आयोजित करून त्याची घोषणा केली. याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. या बैठकीनंतर भाजप आमदार कुमार आयलानी यांचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.