

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यभर निवडणुकांचे वातावरण तापत असताना दिसत आहे. राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवाऱ्यांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान, भाजपकडून महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी स्टार प्रचारक असणार आहेत. (Maharashtra assembly elections 2024)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी आज (दि.२६) जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.