अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

Maharashtra Assembly Election Result | राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत पार पडली बैठक
Ajit Pawar
अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवडfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक, विक्रमी महाविजय नोंदवत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने महाराष्ट्रातील सत्ता दणदणीत बहुमताने पुन्हा हस्तगत केली असून, सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधीदेखील होऊ घातला आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आहे.

थेट बँक खात्यात महिना १५०० रुपयांची ओवाळणी जमा करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा सारा खेळ खल्लास केल्याचे स्पष्ट चित्र आहे. या निवडणुकीत महिलांच्या मतदानात ७ टक्के वाढ झाली आणि हे बहिणींच्या मतांचे दान थेट महायुतीच्या पदरात पडले. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा देत महायुतीने दिलेली हिंदू एकजुटीची हाकदेखील राज्यभर मोठा परिणाम साधणारी ठरली. परिणामी, १४५ हा बहुमताचा जादुई आकडा मागे टाकत महायुतीने थेट २३५ जागांवर झेप घेत आपली सत्तेवरची पकड मजबूत केली. यात १३२ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने आजवरचा सर्वाधिक जागांचा उच्चांक नोंदवला. खालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ आमदार निवडून आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news