

संगमनेर शहर : संगमनेर तालुक्यात नान्नज दुमाला शिवारातील एका विहिरीत 30 ते 35 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. सदरचा मृतदेह पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने विहिरीच्या बाहेर काढला आहे. संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील अण्णासाहेब कृष्णा चकोर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये मंगळवारी सायंकाळी तरुणाचा मृतदेह विहिरीतील आढळून आला.
रात्रीच्यावेळी अंधारात मृतदेह काढता येत नव्हता. त्यामुळे बुधवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेह संगमनेर नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आलेला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तालुका पोलिसांकडे संपर्क साधावा.